सांग तुला सोसल का मी ‘dia’.
जेंव्हा लोकं तुझ्यात नसलेल्या गोष्टींची प्रचिती करून देतील,
जेंव्हा त्यांच्या पूर्णत्वाच्या गोष्टी,
तुला अपूर्ण ठरवतील,
तुझ्यातले अभाव तुला जाणवून द्यायला सुरुवात करतील तेंव्हा तुला सोसल का ती मी ‘dia’
लोकांशी जोडले जाऊ, जगाशी जोडले जाऊ अस व्हाव म्हणून,
जेंव्हा त्यांना बोलायला लागशील,
परंतु ती लोक तुझ्यातला आणि त्यांच्यातला फरक आणि अंतर जाणवून देतील,
तेंव्हा तुला सोसल का ही मी ‘dia’.
जेंव्हा दूर कुठे बसलेल्या माणसांना दिवस रात्र बोलशील,
आणि जवळ असलेल्यांना मात्र फक्त शांतता सोपवशील,
जेंव्हा एकटा एकटा रहायला लागशील, काचाकडे पाहून हसायला लागशील,
जेंव्हा सगळे सोडून जातील,
आणि एकांत तुला तुझा अंत येईपर्यंत छळायला लागेल
सांग तुला सोसल का मी ‘dia’