मी तुला कधीच विसरणार नाही मी नेहमीच असेल तुझ्या नजरेत. तुझ्या डोळ्यात तुझ्या अश्रुत कधी तुला स्पर्श करायची इच्छा झालीच तर हवा बनून येईल तुझ्या चेहऱ्यावर थांबेल विश्रांती घेईल, तुझ्या श्वासात सामावून जाईल, तुझा आवाज ऐकण्यासाठी शांततेशी खूप भांडेल, माझी आठवण काढशील तेंव्हा मनसोक्त हसशील याची खात्री देशील ना रे मला. तू असा शांत नको राहत जाऊ भलेही मी नसेल तुझ्या जवळ परंतु तुझा प्रत्येक आवाज मला ऐकु येतो.
मला पहायची इच्छा झाली तर फक्त डोळे बंद करशील मला पाहशील, थोड हसशील. मी या आकाशातून तुला रोज पाहते, कधी तुला दिसले नाही तर तक्रार करू नको, मी आहे तिथे, तुझ्यात, तुझ्यामध्ये, तुझ्यासोबत.