समाधी…

तुझ्यापासून दूर गेलो तर,
आज उद्या मेलो तर,
समधीवरती माझ्या,.
चार अश्रू ढाळशिल ना,

भलेही मी तुझा कधीच नव्हतो,

तुझ्यासाठी एक समाधीच होतो,

सगळे जेंव्हा पाळतील


सुतक तरी पाळशिल ना,


जीवनभर मी जळत गेलो,
स्वतःलाच छळत गेलो,
जाता जाता शेवटी,
मिठीत एकदा भरशील ना.

प्रेमाची भाकर भाजली तू
माझ्या जळत्या काळजावरती,
करपेल देह हृदय ही तुझे,
हाथ शेकताना.

मी तिथे एकटा असेल,
जस तू या जगात,
मरणाला शरण मी गेलो तर,
आयुष्य नावी करशील ना

मी एक…

मी ही वादळ वारा,
तुझ्या श्वासात शमणारा,
मी अंधार पसरलो आज राती,
तू तारा लुकलुकणारा.

मी आठवण एक जुनी,
तू क्षण उद्भवणारा,
मी हृदय स्पर्शी हाक एक,
तू भाव जाणवणारा.

मी अपूर्ण एक ईच्छा,
तू स्वप्न पाहणारा,
मी जीवन चालत जातो,
तू श्वास थांबणारा

सोचता हून कभी

सोचता हून कभी
की रस्तों पे पडी उन बारिश की नंन्ही बुंदो को
उंगली पकड घर ले आउ,
उनका बिखरना, टूटना,
आस्मांन का हाथ छूटना,
रोक सकुन,
सोचता हून कभी

कभी रस्तो को घर छोड
मंझिल के साथ,
गुमजाऊ, भटकुं इस तरह
ना मिलु जैसे किस्मत का नहीं मिलता,
सोचता हून कभी.

भाग दौड जिंदगी से,
फुरसत लुंन थोडी,
मौत ए सिरहाने, कर आंखे बंद,
बेवजाह ही कहीं रुक जाऊं,
सोचता हून कभी.

वादळ मनी शमले तर…

वादळ आल्यास प्रत्येकजण दरवाजा कोंडून मोकळी होतात, पण वादळ मुक्त नसतो होत कधी, त्याला दूर दूर भटकाव लागत, त्याचा जन्म थांबवण्यासाठी नाही झाला बहुतेक. पण मनातल्या वादळाला थांबवण्यासाठी मी कोणत दार लाऊ बाहेरून जरी मनाची कडी लावली पण अंतरंगात ओढावलेल कस शांत करू. पाठ फिरवून निघाव कुठे थोडा आसरा शोधण्यासाठी तर सगळ उध्वस्त होईल, शांत व्हायची वाट पाहिलेली बरी. पण उभारलेल सर्व काही नष्ट तर होणार नाही ना. ती पाषानावर  अश्रूंनी जोपासलेली फुलं गळू लागलीय आता, तुटून पडतायत. त्या झाडाला कस वाटणार आयुष्यभर जपलेली संपती आपल्यापासून वेगळी होताना, त्रास होईल, वेदना होतील, पण फुल ति फुल शेवटी, जिवंत नसले तरी सुगंध दरवळत राहील त्यांचा. त्यांच्या मृत्यूच कारण मी वादळाला धराव की मनाची घुसमट जपण्यासाठी पाळलेल्या जिवंत वादळाला.

प्रश्न पडतो….


कपडे वस्तू, गोष्टी, जसे माणूस बदलतो तितक्याच सहजतेने आयुष्य बदलता आल असत तर खूप छान झालं असत नाही का! एखादा कपडा एखादी चप्पल लहान मोठी झाली आपण बदलून घेऊ शकतो, त्या कपड्याचा रंग नाही आवडल आपण बदलून घेऊ शकतो, पण जर कुणाला आयुष्य बदलून दुसर मिळवायचं असेल तर कोणत्या बाजारात जावं लागेल प्रश्न पडतो कधी.  कामावरून सुट्टी मिळवू शकतो, वस्तू खरेदीवर सुट मिळवू शकतो, देह थकल्यास विश्रांती घेऊ शकतो, वय झालंय रिटायरमेंट घेऊ शकतो पण आयुष्याच्या पाठी ओझं ओढत पुढे घेऊन जाणारं आयुष्य आपण थांबवू शकतो का प्रश्न पडतो. आज मला नाही जगायचं आज मी सुट्टीवर आहे, रोज रोज काय श्वास घेणं, जेवण, तेच काम तेच झोपणं तेच श्वास आणि तीच हवा, आपण या पासून एक दिवस सुटका नाही का मिळवू शकत.  कामावरून सुट्टी हवी असेल तर बॉस ला विचारतो  आयुष्यातून एक दिवस रजा हवी असेल तर कोणत्या साहेबाला भेटाव लागेल, आणि देव जर तो साहेब असेल तर इतक्या जाती इतकी धर्म कोणत्या देवाला कोणत्या साहेबांकडून सुट्टी मिळेल किंवा मागावी प्रश्न पडतो. घर बनवण्यासाठी घर सोडतो, पोट भरण्यासाठी भुके मरतो, शिक्षण घेण्यासाठी पैसे जमवायचे असतील तर शाळा बुडवून आधी काम करावं लागत.जगण्यासाठी मरतो, स्वप्नासाठी मरतो, व्यक्तीसाठी, प्रेमासाठी, पैशासाठी, मरतो, इच्छामरण, शोषण, अत्याचार, भूक दारिद्र्य या पलीकडे आयुष्य आहे की हेच आयुष्य प्रश्न पडतो.  सकाळ आशेला जन्म देते, मेहनत त्याचा सांभाळ करते  आणि निराशा रातीला मृत्युदंड देते हेच का आयुष्याचं सार प्रश्न पडतो

शहर….

यूं ही नहीं भटक जाता हून मैं,
सांस बन सिने मैं अटक जाता हून मैं
खाली हाथ लौटते वक्त थोडा मुस्कुरा लेता हून,
घर के अंदर ना सही, कम से कम घर तक तो जाता हून मैं.. राहुल…