साहेब…..

थोड दूरचं थांबा साहेब!
माझा काळा रंग, फाटकी कापड,
तुम्हाला मळक करतील,

जमलंच तर बोलण टाळा माझ्याशी,
कारण मला शुद्ध बोलता येत नाही
तुमची प्रमाण भाषा,
आम्ही खूप कमी प्रमाणात बोलतो,
काय म्हणतात ते इंग्लिश, ते तर येतच नाही.
हां येतात चार दोन शब्द,
माफ करा त्यांचा तुम्हाला काही फायदा होणार नाही,
पण एकूण आपलेपणा जाणवेल एवढी खात्री देतो.

हां साहेब ते पांढरा शर्ट जो तुम्ही चढवल आहे ना,
ते आम्ही उन्हात मेहनत अंगावर चडवून,
निर्माण करतो,
तुमच्या पिझ्झा, तुमचा सँडविच, आणि ते तुमचं डोमिनोज,
ते आम्ही लेकरांसारख जपलेल्या आणि आमच्या लेकरांपासून हिस्काटून घेतलेल्या पिकांचं अंश त्यात शामील आहे.

One thought on “साहेब…..

  1. तुमच्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द आम्हा पामरांसाठी अमृताहूनही गोड वाटतो♥️

    Liked by 1 person

Leave a reply to सुदर्शन मारकड Cancel reply