माणसाने उगाच जातीच, देहाचं, रंगाचं देशाचं आव आणून स्वतःला लोकांमधे मी खूप महत्वाचा मी असा मी तसा दाखवू नये उगाच, इथे आपण एकटे जन्माला आलो आणि एकटेच जाणार, पैसा संपती तर सोडाच पण आपण आपल आयुष्भर पोसलेल्या देहाला सुधा सोबत नेऊ शकत नाही, एखाद्याच्या आयुष्याची राखरांगोळी आपण जिवंत असताना करतो तसचं आपल्या देहाला जाळल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या राखेला हवेत उडवलं जात, कधीकाळी एकत्र गुंफलेल आपल देह कणाकणात विभागला जातो. चार दिवस अश्रू पुसायला येतात काही चेहरे ओळखीचे परंतु परके असलेले, आणि पुन्हा तेच जग एकदम सुरळीत चालू लागत, आपण उगाच समजतो आपली जागा कुनी घेऊ शकत नाही पण जास्त नाही साधा विचार करायचा, एखाद्या व्यक्तीला पुल पार करून पुढे जायचं असेल तर आणि ती रिकामी जागा भरून काढतो का तर आपल्याला पुढे जायचं आहे, आपण थांबलो तरी आयुष्य आणि वेळ कधीच थांबत नाही.
शेवटी काय उरतं…
Published by Pawarrahuls
I'm a literature Student, I like to play with words when people play with my emotions, I just want to express the world the way I feel View all posts by Pawarrahuls
Published