माणसे…

भेटतात का रस्ती,
मातीत रुजलेली माणसे,
दारिद्र्याच्या ओझ्याखली
दबलेली माणसे,

दारोदारी हाथ पसरत,
अभिमान,अपमान, त्रास विसरत
व्यवस्थेला व्यवस्थित न
जपता आलेली माणसे.

अंतरंग सारीत
जवळ रंग करता
देवासारखी ना
पूजता आलेली माणसे,

अहंकाराची बांध इमारत,
कुंपण भिंती बांधून स्मारक
माणसाने माणसापासून
वेगळी केलेली माणसे