गर इश्क निभाना हो…

गर इश्क निभाना हो,
प्यार जताना हो
तो पास आ एहसास जगा,
वरना जिस जगह है वही से मोड अपना रास्ता, छोड ये कहानी लिख एक दास्तान.
अपना गुरुर कुरबान कर,
आखों को जुबान कर..
अब भी वक्त है जीनेको,
जाम जिंदगी का पिनेको
. बेहते आंसु केहते है,
जो तडपती आँखो में रेहते है.
बात एक मानले,
तू अकेला है जान ले.
थोडा मुस्कुराया कर,
खुदके लिये आया कर,
क्यू छोड जाता है हमेशा,
कभी तो साथ निभाया कर

गर इश्क निभाना हो,

प्यार जताना हो तो पास आ एहसास जगा, वरना जिस जगह है वही से मोड अपना रास्ता, छोड ये कहानी लिख एक दास्तान. अपना गुरुर कुरबान कर, आखों को जुबान कर.. अब भी वक्त है जीनेको, जाम जिंदगी का पिनेको. बेहते आंसु केहते है, जो तडपती आँखो में रेहते है. बात एक मानले, त,

हरवताना….

आयुष्य कितीही अवघड असल तरी जगणं मात्र सोपं केलं जाऊ शकत. मान्य आपण सर्वकाही पाठीमागे सोडून येतो, खूप काही राहून सुधा जातं, पण वळून पाहताना आनंद होतो हे निश्चित आणि दुःख होतो ते वेगळच. कधी हरवलो तर स्वतःला शोधन सोयीस्कर होत, कधी भटकलो तर सापडतो घरचा रस्ता. कधी सोडून दिलेलं बर मनाशी आजवर लावलेलं, मनात खूप काही साठवता येतं, आठवलं तर आठवता येतं, स्वतःला दोषी मानतो आपण भूतकाळासाठी, वर्तमान मान खाली घालून तिथेच बसलेला असतो आपली वाट बघत पुढे भविष्याकडे वळायचं असत,  गमवलेल मिळवायचं असत. निरंतर चालणारा प्रवास पूर्ण करणे आणि अपूर्ण ठेवणे यात इच्छेच काहीच नसत. अपेक्षांचं ओझ असत एक हृदयाच्या पाठीवर, आशेने भरलेले डोळे कधी भारावून पण जातात, नेहमी पायाला लागलेली ठेच मनाला लागली तर. काही प्रश्नांची उत्तर बाकी असतात शोधन, काही टाळतो सुधा आपण. दुसऱ्याचं मन जपता जपता स्वतःच मन मात्र राहून जातं जपायच. अचानक बोलू लागतो, अचानक शांत होतो, आपल्या जीवनाचा का कसा देहांत होतो. नियती असेल नशीब असेल, सगळे हतबल करतात, ताकत म्हणून, ताकत बनून शेवटी व्यर्थ ठरतात. सगळ काही थांबत अचानक, चालणारा श्वास जीवन अजूनही जगायचं बाकी आहे, काही श्वास शिल्लक आहेत शुल्लक जिवन जगण्यासाठी अस क्षणभर सांगून जातात, शब्द जिभेवर टांगून जातात, मग काय अर्थांच्या मिठीत सापडतो फक्त शांततेचा सहवास. ओळखीच्या व्यक्तीकडून मिळालेल्या अनोळखी भावना स्वतःची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न नेहमी करतात पण आपण फिरवतो पाठ आणि होतो परके स्वतःसाठी. पाऊल थांबले तरी, प्रयत्न थांबले तरी, चालायला हवं, हवं ते मिळवण्यासाठी चालायला हवं.

करशील ना…

हृदयाचा हाथ पुढे करशील ना,
डोळ्यांच्या धरणावरती गेल्यावर,
पांढर कापड बाजूला सारून,
एक हाताने हातात धरून,
चेहरा तरी पाहशील ना,
सरणावरती गेल्यावर

मनाला न्याय मागताना…

काही गोष्टी खोलवर मनात रुजविलेल्या बऱ्या, उगाच त्यांना बाहेर वादळ निर्माण करायला लाऊ नये. पण आपण किती दिवस त्या भावनांना एकट सोडणार, मनाच्या तिजोरीत, तीलासुधा एकटेपणा जाणवत असेल कदाचित, अंधाराची भीती प्रकाश सोडता सगळ्यांना असते अगदी, पहाटेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बेधुंद वाऱ्यालासुधा. सतत हरवणाऱ्या अस्तित्वापेक्षा एकदाच सापडलेल मरण कधीही चांगलं, कमीत कमी प्रत्येक श्र्वावसावर नजर ठेवावी लागत नाही, पुढे चालणारे पाऊल चोरतात स्वतःला जमिनीपासून.
सावट म्हणून सर्वत्र पसरणाऱ्या, सावलीला भिती फक्त उन्हाची, वादळाला दारातच सोडून एकटी भटकते आसरा शोधत, अनाथ आठवणी जाग्या होतात, संपवतो एकदाच सर्वकाही ज्याला आपल म्हणून जपल होत.
वर्षानुवर्षं जपलेली शांतता अचानक शब्दात रमून जाते, अर्थांचा मोह चडतो त्याच्या स्तबधतेला, परक्या भावना परततात मृत देहाच्या मदतीस, पुन्हा एकदा अडकवतात स्वतःला सडलेल्या विचारांच्या चोकटीत, डोळ्यांच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचतात लाटांनी विसर्जित केलेले अश्रू पण अगदी कोरडे असतात जखमांच्या जाळ्यात कैद असणाऱ्या वेदणेप्रमाने. स्वतःला नाकारून मिळवलेल अस्तित्व सापडत दयनीय अवस्थेत जिवंतपणाची प्रचिती देण्यासाठी. राहुल…….

बूँद आँखो से..

सफर से बेखबर कुछ मुसाफिर फिर रहे हैं
ये हम किस जिंदगी की खातिर मर रहे हैं,
तेरी आँखो मैं आँसु भी नहीं दीख रहा,
तो  बंता ये जमीन को चुमते बूँद कहां से गिर रहे हैं.

सांग आठवतात का तुला…

सांग आठवतात का तुला,
तळहातावर टिपलेल्या मुबलक रात्री, पहाटेच्या दिशेने वळताना,
सांग आठवतात का तुला, गारठलेल्या थंडीत स्वतःच हजारों वेळा जळताना,
सांग आठवतात का तुला, त्या नजरांचा अपमान पचवणारा सहवास तुझा, जो शोधन्या सापडला नाही,
सांग आठवतात का तुला, आंधळ्या रात्री हरवलेले स्वप्न उद्याचे, सांग परतले का कधी.
सांग आठवतात का तुला
आशेच्या नावावर  केलेले अश्रूंचा शिक्कामोर्तब,

ठरवून घेतो आता….

आता ठरवून घेतो पुन्हा नाही जगायचं,
जिथे आपल कोणी नाही त्या गावी का जायचं,
फिरून झिरून मन अगदी थकून गेलं आहे,
सगळ काही फिरल उलट, साला नशीब कुठे मेल आहे.
भेटला ओळखीचा कोणी तर भेटायला मला सांगू नका.
रक्ताला थोडी जागा द्या, तलवार कायम टांगु नका
झाला पसारा सावरून घे, मना स्वतःला आवरून घे,
आता स्वतःला सांभाळल तर अश्रू ढाळावे लागणार नाहीत,
होऊ नका स्वस्त एवढे, की लोक सहवास मागणार नाहीत
बऱ्याच काळानंतर ओसाड भिंती बोलत आहेत, पण एकने आता शक्य नाही, कारण कानांनाही सवय झालिये शांततेला ऐकत एकटे बसण्याची. पहिले वाटायची भीती अंधारात रात्र घालवायची, परंतु आता, माझ्या झोपडीकडे सावकाश येणाऱ्या प्रकाशाला बरीच कुंपणे पार करावी लागतील.

तोच अपघात घडतो रोज

तोच प्रश्न पडतो रोज,

पण तरीही दररोज घायाळ होतो मी, सांगा उगाच का उदास होतो मी
आता काही नको मला, नाही
प्रश्न ना ती ग्वाही नको मला,
जगणं माझं विस्काटूनी मला जो श्वास द्याला, तो ही नको मला,  श्वास नको सहवास द्या, फक्त शब्द नको आवाज द्या, हां हे सगळ तुम्हाला जमेल तेंव्हाच द्या,
या भासाच्या या त्रासाच्या पलिकडे काही तरी नकीच आहे,
कुणी दाबेल गळा अर्ध्या क्षणात, सगळ्यांना भीती हीच आहे..