आयुष्यातील सर्वात वाईट दिवस जगत होतो मी, अंगात काहीच ताकत नव्हती, ना जेवण होत ना जेवू घालणार कोनी. मी मरत असताना कुणाचं जगणं थांबल नव्हत हे मात्र नक्की, माझ्या नाकातून रक्त बाहेर पडत होते, नाकातून रक्त, आणि डोळ्यातून अश्रु जमिनीला स्पर्श करत होती. पोटात अन्नाचा कण नव्हता, डोळ्यांची पापणी देखील उघड झाप करून थकली होती. माझं त्रास जाणून घेणारा कोनी नव्हता, माझ्यातला मी सुधा नव्हतो याने मला अजुन त्रास होत होता. हाक द्यावी कुणा, शब्दच नव्हते सुचत. एक क्षणासाठी मानवी आयुष्य किळसवाणा आहे अस वाटून गेलं, क्षणभर तर मरून जावं अस सुधा वाटल पण मी लाचार होतो मरू शकलो ना मारू शकलो स्वतःला. मरण पथकाराव म्हणल तर ते ही झालं नाही. का जगावं माणसानं, कोणासाठी कशासाठी, आयुष्यभर मरमर करायची नीट जगायचं नाही, नीट झोपायच नाही, एक दिवस गेला की दुसरा दुसरा गेला की तिसरा, हे कधी संपणार, स्वतःला संपवाव तर हे सगळ संपेल पण त्याची सुधा खात्री नाही, मेल्यानंतर त्रास होणार नाही, आपण अजून लाखों मृत्यू मरणार नाहीत याची निश्चिती कोण देणार