वळून पाहता कळून चुकले..

हातातून रेती निसटून जावी तस नाती निसटून जातात, आपण अपंग उभे राहतो, समुद्र किनारी, पाण्याची ओहोटी पायाला स्पर्श करून हरवलेल्या मनाला शोधण्यास मदत करते. आशेच एक क्षितिज, पाठ फिरवून थांबलेला असतो त्या पलिकडे दिसतात काही चेहरे काळाच्या पडद्याआड लपलेली. क्षणभर शांतता पसरते मनाच्या गोंधळाला न्याय देण्यासाठी. हातात उरलेलं असत आयुष्य ते उधळावं की जपावं मनाची हेळसांड पाहून हाच प्रश्न उपस्थित होतो. आयुष्य आणि जगणं यात फार दुरावा आलेला असतो, आपण श्र्वासाच अंतर भेदन्या असमर्थ ठरतो. स्वतःच अस नाउमेदी जीवन जगताना मदत अजिबात करावी वाटत नाही.

स्वतःच स्वतःला सावरत असताना, सापडले काही अर्ज जुने, आयुष्य परत मिळिण्यासाठी.

मृतदेहावर लाकडासारख्या इच्छा लादणाऱ्यानो,
सामील व्हा जळालेल्या राखेत सापडणारे माझे अवशेष शोधण्यासाठी, पुढे या डोळ्यातल्या रक्ताची मूर्ती स्थापित करण्यासाठी, माझ्या आत्महत्येत भरलेल्या रक्ताने लदबद
हाथ तुमचे देवापुढे झुकवताना लाज वाटूद्या थोडी. मला निरोप देताना तुमचे डोळे भिजणार नाहीत याची खात्री हवीय मला, माझ्या राखेला हवेत तरंगत सोडले तरी चालेल पण तुमचे निर्दयी हाथ त्याला स्पर्श करणार नाहीत याची खात्री घ करायला विसरू नका.. कपाटात गुंडाळून ठेवलेला फोटो, डोळ्यातल्या डोळ्यात ढाळलेला अश्रूचा थेंब तुम्ही आतल्या आत न पचवता वाहून द्या एखाद्या स्थिर असणाऱ्या समुद्रात. माझे डोळे बंद झाल्यानंतर कुणाचे डोळे मला शोधत इकडे तिकडे वाऱ्याच्या प्रवाहासारख भटकणार नाहीत याची जबाबदारी तेवढी घ्या. माझ्या चेहरा तुम्हाला पुन्हा दिसणार नाही, दिसला तरी मी त्यात असणार नाही, रडायचं जरा विचार सोडा, मी अश्रू पुन्हा पुसणार नाही आता…..

कसल प्रेम

माणसाने प्रेम का करावं, खूप जीव लावायचा, आणि अचानक जिनवतपणी च मृत्यू देणे, एकीकडे म्हणायचं तुझ्या चेहऱ्यावरील हास्य मला खूप आवडते, त्याला टिकवून ठेवेल नेहमी आणि त्याच व्यक्तीला रडायला लावायचा, ज्याला खूप ओळखतो त्याला एवढ अनोळखी आपण का बनवतो, ज्या व्यक्तीला पाहून आपल्या हृदयाला आयुष्य लाभत, त्याच व्यक्तीला निर्दयी होऊन, दुर्लक्ष करणे योग्य कसे, एखाद्या व्यक्तीला जग म्हणायचं आणि त्याला पुन्हा आपल्या जगात, एक जागा सुधा नसते अस का , तू माझं सर्वस्व म्हणत, तू माझं काहीस नाहीस. तुला कधी च नाराज नाही करणार म्हणत, ज्या व्यक्तीला तू माझं जीव आहेस, आयुष्य आहेस त्याच व्यक्तीने jiv घ्यावा आपण का वागतो. एखाद्यात जीव अडकला की बाहेर निघन खूप जायचं

जगणं हे जगणं

आयुष्यातील सर्वात वाईट दिवस जगत होतो मी, अंगात काहीच ताकत नव्हती, ना जेवण होत ना जेवू घालणार कोनी. मी मरत असताना कुणाचं जगणं थांबल नव्हत हे मात्र नक्की, माझ्या नाकातून रक्त बाहेर पडत होते, नाकातून रक्त, आणि डोळ्यातून अश्रु जमिनीला स्पर्श करत होती. पोटात अन्नाचा कण नव्हता, डोळ्यांची पापणी देखील उघड झाप करून थकली होती. माझं त्रास जाणून घेणारा कोनी नव्हता, माझ्यातला मी सुधा नव्हतो याने मला अजुन त्रास होत होता. हाक द्यावी कुणा, शब्दच नव्हते सुचत. एक क्षणासाठी मानवी आयुष्य किळसवाणा आहे अस वाटून गेलं, क्षणभर तर मरून जावं अस सुधा वाटल पण मी लाचार होतो मरू शकलो ना मारू शकलो स्वतःला. मरण पथकाराव म्हणल तर ते ही झालं नाही. का जगावं माणसानं, कोणासाठी कशासाठी, आयुष्यभर मरमर करायची नीट जगायचं नाही, नीट झोपायच नाही, एक दिवस गेला की दुसरा दुसरा गेला की तिसरा, हे कधी संपणार, स्वतःला संपवाव तर हे सगळ संपेल पण त्याची सुधा खात्री नाही, मेल्यानंतर त्रास होणार नाही, आपण अजून लाखों मृत्यू मरणार नाहीत याची निश्चिती कोण देणार

मी माझा मृत्यू

मी काय पुरावा देऊ माझ्या जिवंतपणाचा,
आवाज नाही, शब्द नाही, डोळे असून दिसत नाही,
माझं अस्तित्व फक्त त्या शेतातल्या मृत अवस्थेत परंतु जिवंत उभे असणाऱ्या बुजगवण्याला विचारा. माझं अस्तित्व तसचं झालंय आता. काही माणसे बोलायला एकायला नसली तरी काय, मी आजकाल शांततेशी गप्पा मारत असतो, तुमच्यापेक्षा ती पाखर चांगली मला रोज बोलतात, माझे हाल विचारतात. मी त्यांना एकूण तृप्त होतो

काही तत्वे जगण्यासाठी…

आयुष्यात कुणाची वाट पाहत बसू नका, जर आपण ज्याची वाट पाहतोय त्याला कळलं तर तो निश्चितच उशिरा येईल.
2)आयुष्यात वेळेवर काहीच होत नाही, भेटत नाही, ज्याला गरज असते त्याला कधीच भेटत नाही, ज्याला गरज नाही त्याला नेहमीच भेटेल त्याला magaychi गरज पडणार नाही.
3)स्वतःच अस्तित्व जगासाठी, एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचं असेल तरच तुमची किंमत केली जाईल अन्यथा नेहमीच कचरा पेटीत कचरा होऊन आयुष्य व्यतीत कराव लागणार.
4) इथे कोणीच कायमच राहणार नाही, आपल कोणीच नाही ही गोष्ट जितक्या लवकर कळाली तेवढी चांगली. आपल्यावर कुणाचं जीवापाड प्रेम आहे, ती व्यक्ती माझ्याशिवाय जगूच शकणार नाही.
5) उगाच कोणासाठी रडून, शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी करण्यात काहीच अर्थ नाही. फक्त रडून चेहरा ओला केल्याने कोरडी जख्म भरून निघत नाही.
लोक तुमच्या जखमेवर फुंकर घालत बसत नाहीत, ती तुमच्या जखमेवर मलम लावतील अशी अपेक्षा अजिबात करू नका, उलट ती लोक जखमेवर मीठ चोळायला आलीत तर त्यांना पाहुणचार केल्याशिवाय परतून लावू नका.

I wish…

I always had a wish to speak,
But I don’t know I was not audible to them.
I longed for words but my words had no meanings, they were less in meaning as meaningless. My life has changed alot because life changes by minutes, and  change is required everywhere. I feel blessed to be alive. It is more than enough for me, and I’m happy too, what is there to be more than this. I have people around who loves me more than me, they care about my smiles when I’m not feeling well about something.  Whenever try to close my eyes at night I just remember the happy moments I had with the people who were very close to my heart.. I have no regrets about everything that happened to me, whatever it was it was destined to happen and only because I could live, be , survive, those events I’m here today. Today I have my own existence and I can say I’m something today. Though my eyes were filled with tears all the while but the emptyness of my eyes has replaced with hope and satisfaction in it

चुका सापडल्या तर माणूस हरवतो..

जेंव्हा काही मानस तुम्हाला काहीही करून ओळखू शकत नाहीत, तीच मानस तुमच्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक शब्दाला तुम्हाला सांगत बसतात की मी तुला चांगलंच ओळखतो. आपण एखाद्या बाबतीत चुकीची समजूत तयार केली असेल तर आपल्याला अधिकार नाही त्याला मी समजू शकतो म्हणण्याची.. तसही गरज संपली की मानस दूर पळायला लागतात, तुमच्यात चुका शोधायला लागतात, त्यांनासुद्धा स्वतःला धीर द्यावा लागतो सोडून जाताना की हा चुकीचा वागतोय, हा स्वार्थी आहे, हा असा हा तसा. पण आपण गप्प बसायचं जस बस स्थनकाजवळ एखादा झाड असतो तसे, घट पाय रोवून उभ रहायचं, किती प्रवासी आले राहिले, गेले, येतील जातील, उतरले चडले पता नाही,उगाच त्यांचा हिशोब करण्यात वेळ घालू नये, ती माणसे येतात आपल्या आपल्या मर्जीने आणि जातात सुधा, मग का कुणाला हाथ धरून थांवण्याची वेळ यावी, त्यांचा प्रवास आपल्यापर्यंत संपत अस आपण उगाच उराशी बांधून फिरायला नको.

Just stories..

मृतदेहावर लाकडासारख्या इच्छा लादणाऱ्यानो,
सामील व्हा जळालेल्या राखेत सापडणारे माझे अवशेष शोधण्यासाठी, पुढे या डोळ्यातल्या रक्ताची मूर्ती स्थापित करण्यासाठी, माझ्या आत्महत्येत भरलेल्या रक्ताने लदबद
हाथ तुमचे देवापुढे झुकवताना लाज वाटूद्या थोडी. मला निरोप देताना तुमचे डोळे भिजणार नाहीत याची खात्री हवीय मला, माझ्या राखेला हवेत तरंगत सोडले तरी चालेल पण तुमचे निर्दयी हाथ त्याला स्पर्श करणार नाहीत याची खात्री घ करायला विसरू नका.. कपाटात गुंडाळून ठेवलेला फोटो, डोळ्यातल्या डोळ्यात ढाळलेला अश्रूचा थेंब तुम्ही आतल्या आत न पचवता वाहून द्या एखाद्या स्थिर असणाऱ्या समुद्रात. माझे डोळे बंद झाल्यानंतर कुणाचे डोळे मला शोधत इकडे तिकडे वाऱ्याच्या प्रवाहासारख भटकणार नाहीत याची जबाबदारी तेवढी घ्या. माझ्या चेहरा तुम्हाला पुन्हा दिसणार नाही, दिसला तरी मी त्यात असणार नाही, रडायचं जरा विचार सोडा, मी अश्रू पुन्हा पुसणार नाही आता..