पापण्यांना भिजवत….

अवतीभवती त्याच पापण्या,
मज नजरांची भीती आहे
साधा एक माणूस ना इथे,
बघा गर्दी किती आहे,

एकायला कोनी कान अपुरे,
नुकतेच पेरीले शब्द,
कुनी चोरला अर्थ तयाचा
डोळ्यात साचले रक्त.

मी ही घेतले कागद थोडे
जेंव्हा श्वास घ्यायचे होते,
नुसत्याच तुडवल्या वाटा हाताने
तिथे पाऊलाना जायचे होते.

राहुल….

Funeral speech

मी मृत्यूच्या गावी परतलो तर,
चिंता व्यक्त होणे नाही.
आता बघून तुम्ही काय करणार,
होतो जिवंत तेंव्हाच दिसलो नाही.

हृदयाने सोडला श्वास मोकळा,
देह जळूनी गेला,
मृत्यूच्या छायेत आज मी ऊभा,
जीवना अर्थ कळूनी गेला.

मीच कळाया अवघड होतो,
मज हेच सांगणे होते.
वेदनेचा सडा अंगणात माझ्या,
ते गाव कुणाचे होते. राहुल….

जेंव्हा काही माणसं…

जेंव्हा काही मानस तुम्हाला काहीही करून ओळखू शकत नाहीत, तीच मानस तुमच्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक शब्दाला तुम्हाला सांगत बसतात की मी तुला चांगलंच ओळखतो. आपण एखाद्या बाबतीत चुकीची समजूत तयार केली असेल तर आपल्याला अधिकार नाही त्याला मी समजू शकतो म्हणण्याची.. तसही गरज संपली की मानस दूर पळायला लागतात, तुमच्यात चुका शोधायला लागतात, त्यांनासुद्धा स्वतःला धीर द्यावा लागतो सोडून जाताना की हा चुकीचा वागतोय, हा स्वार्थी आहे, हा असा हा तसा. पण आपण गप्प बसायचं जस बस स्थनकाजवळ एखादा झाड असतो तसे, घट पाय रोवून उभ रहायचं, किती प्रवासी आले राहिले, गेले, येतील जातील, उतरले चडले पता नाही,उगाच त्यांचा हिशोब करण्यात वेळ घालू नये, ती माणसे येतात आपल्या आपल्या मर्जीने आणि जातात सुधा, मग का कुणाला हाथ धरून थांवण्याची वेळ यावी, त्यांचा प्रवास आपल्यापर्यंत संपत अस आपण उगाच उराशी बांधून फिरायला नको