शांततेत कसली शान

आपन उगीच म्हणतो शब्दात खूप ताकद असते म्हणून,  पण शांतता क्षणाला चिकटून असेल तर शब्दांनाही लाचार व व्हावं लागत, खरतर शब्दात फक्त गोष्टी व्यक्त होतात, शब्दां आड लपलेल्या भावना तर तिथेच पडून राहतात मृत अवस्थेत. त्यांचा ना कोनी वाली असतो, ना कुणी त्यांना एकणारा. अशा परि्थितीमध्ये अर्थाशी भांडण करावं की पराभव स्वीकारत माघार घ्यावी सांगणं अनिश्चित. एका हृदयाला समजून घेताना जर समोरचा हृदय जिवंत नसेल तर त्यातून काहीच सिद्ध होणार नाही. माणूस एवढा लाचार का व्हावा की त्याला स्वतःचे अश्रू पुसायला स्वतःचा हाथ देखील समोर येऊ नये. ते डोळ्यातून ढाळलेले मोती आयुष्य नावाच्या समुद्रात खूप खोलवर जातात त्या अफाट सागरात स्वतःच अस्तित्व उधळून देतात.

Leave a comment