आज वर्ष झालं घर नावाची संकलपना फक्त कल्पनेत आहे, आज पाऊल घराकडे वळले आहेत शेवटी, परीक्षा आणि प्रतीक्षा संपली आहे असं म्हणायला हरकत नाही, भूतकाळात जमा झालेल्या वर्षात खूप काही घडल, खुड वादळ सुढा येऊनी गेली, काहींनी विखुरेल, काहींनी सावरलं सुद्धा, मृत्यूशी झुंज झाली, वर्तमान बदलल, मानस हिरावली आनी काही भेटली काही आहेत सोबत, काही आहेत हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी अजूनही जिवंत. मी असाच जगतोय काही आठवणी काही पश्र्चाताप उरी बाळगून. गमवल, मिळवलं, कमवल खूप काही केलं खूप काही राहून गेलं, खूप काही करायचं बाकी आहे. उरलेलं, जगलेल आयुष्यं आहे हातात.
” काही आठवणींनी दम तोडला भूतकाळाच्या मिठीत तर काही काळाच्या ओघात हरवून गेल्या, उरल्या सुरल्या जगत आहेत गुदमरत अगदी माझ्यासारखं भविष्याच्या तावडीत सापडलेली”.
आजवर जि धाव घेतली, प्रवास केला, अट्टहास केला त्यातून मिळवायचं काय होत माहीत नाहीं अगदी भविष्यासारख परंतू काय गमवायच नाही हे मात्र ठाऊक होत, आपण शेवटी नियतीचे बाहुले, अगदी थॉमस हार्डी म्हणतो तसे “Human beings are the puppets in the hands of malacious fate”.
नशीबासमोर नतमस्तक व्हावचं लागत, शरण जावच लागत, काहीही, कसाही, कितीही भयंकर अडचण निर्माण झाली तरी त्याला सामोरे जाणे, त्याला सहन करणे, त्यातून शिकने, आणि पुढे चलत राहणे एवढंच आपल्या अपंग हातात माणूस म्हणून जगताना.