वेळ खूप निर्दयी असते, वेळेने दिलेल्या जख्मा आयुष्यभर भरत नाहीत. वेळेला कोण हरवू शकतो. आजही हतबल मनुष्य आहेच य वेसमोर
बदल: काळानुसार बदलन कितपत योग्य. हा स्वार्थ असतो, जगाची रीत असते, की असते केलेली तडजोड विस्कळीत झालेलं आयुष्यं जोडण्यासाठी. वेळ बदलते आपण बदलतो, की जागा,गोष्टी बदलतात. माणसाने एखाद्या झाडा सारखं असावं सतत ऋतू बदलला तर स्वतःची पाने बदलावी नवीन फळांना फुलांना फुलवाव. पाकळ्यांना पानांना जन्म द्यावं जपावं जी सोडून द्यावं त्यांचे हात स्वतःचे अस्तित्व टिकवताना. ऋतू बदलतो पाने वाऱ्याच्या माध्यमातून हिरावून दूर केली जातात. खाली गळून पडतात अगदी पायथ्याशी आपल्याच उभ्या अस्तित्वाच्या बाजूला मृत अवस्थेत, खाली पडलेल्या पानांना सावराव जपावं की शोक सभा भरवित परतून लावावं त्यानं प्रश्न पडतो. गमवलेल्ल्या पानांमुळे बसावं झुरत रडत की करावं स्वागत नव्या उमेदीने पुढे येणाऱ्या दुसऱ्या आयुष्याची सुरुवात. एकवेळ सगळ जून विसरून करूया सुरुवात. पण त्या घरत्यांचा काय झालं जे त्या झाडावर घर करून होती त्या पानांचं काय झालं की स्वतःला आपल्यामध्ये कुठेतरी शोधत होती आसरा मागत होती