आयुष्यातील सर्वात वाईट दिवस जगत होतो मी, अंगात काहीच ताकत नव्हती, ना जेवण होत ना जेवू घालणार कोनी. मी मरत असताना कुणाचं जगणं थांबल नव्हत हे मात्र नक्की, माझ्या नाकातून रक्त बाहेर पडत होते, नाकातून रक्त, आणि डोळ्यातून अश्रु जमिनीला स्पर्श करत होती. पोटात अन्नाचा कण नव्हता, डोळ्यांची पापणी देखील उघड झाप करून थकली होती. माझं त्रास जाणून घेणारा कोनी नव्हता, माझ्यातला मी सुधा नव्हतो याने मला अजुन त्रास होत होता. हाक द्यावी कुणा, शब्दच नव्हते सुचत. एक क्षणासाठी मानवी आयुष्य किळसवाणा आहे अस वाटून गेलं, क्षणभर तर मरून जावं अस सुधा वाटल पण मी लाचार होतो मरू शकलो ना मारू शकलो स्वतःला. मरण पथकाराव म्हणल तर ते ही झालं नाही. का जगावं माणसानं, कोणासाठी कशासाठी, आयुष्यभर मरमर करायची नीट जगायचं नाही, नीट झोपायच नाही, एक दिवस गेला की दुसरा दुसरा गेला की तिसरा, हे कधी संपणार, स्वतःला संपवाव तर हे सगळ संपेल पण त्याची सुधा खात्री नाही, मेल्यानंतर त्रास होणार नाही, आपण अजून लाखों मृत्यू मरणार नाहीत याची निश्चिती कोण देणार. कोरोनाची लागण होऊन आज मला आठ दिवस झाली होतो, खिशात पैसे पोटात अन्न, आणि पाठीवर मदत म्हणून वास्तव्य करणारा हाथ नव्हता. अगदी अंतरूनाशी खिळून होतो, पोटात खूप आग होत होती, भुकेने व्याकुळ होऊन जीव जायला यायचा, आणि ज्या क्षणी एखादा घास ओठांच्या दिशेने वळवावा तर जिभेला ते सहन होत नव्हत. या सगळ्या त्रासात असताना, खूप खूप हतबल होतो मी अगदी अपंग माणसासारख. रडू वाटत होत पण दुर्दैवाने ते सुधा करू शकलो नाही मी. तुम्ही अडचणीत असताना बाकी सगळे कसे दोन पाऊल दूर थांबून कसा तमाशा बघतात याचा विसर मला पडू दिला नाही माझ्या आजाराने. म्हणतात कितीही मोठा आजार झाला, जर एखादा माणूस काळजी घेणारा असेल तर देहात थोडस का होईना बळ येत माणसाच्या. पण जर तीच मानस चार पाऊल दूर जाऊन थांबली तर जिवंतपणीच मरण आल्यासारखं वाटत. माणूस नरकात जगतो.
काही दिवसांनी स्वतः सोबत आहे, त्रास होतोय पण ठीक आहे मी. काही तक्रारी आहेत पण ही अश्रू पुसण्यासाठी कोणाच्या हातांची अपेक्षा करू. मी स्वतःच स्वतःला सावरत आहे. या आठ दिवसात, जगाची रीत कळाली, प्रियेची प्रीत कळाली, काही दुःख काही अनुभव मिळाली. मला फक्त एवढीच खंत आहे, मी जिवंत आहे. मी जगायला सुरुवात केलीय आता. मरण काही नवं नव्हत माझ्यासाठी. अनंत वेळेस मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले मला. कधी भावना मृत देहासाख्या पडून राहिल्या हृदयाच्या अंतरूनाशी खिळून राहिलो. का सगळा प्रवास श्वास घेत पुढे चालू ठेवला जरी माझा प्रवास पूर्ण झाला नसला तरी अपूर्ण सुधा नाहीये. काही क्षणांचा हिशोब ठेवत आहे, पण स्वतःला जाळून अश्रू ढाळून पाठलाग केला स्वतःच्या पायावर विश्वास ठेऊन. भुक, चिंता, पैसा संपत्ती, वैभव्या काहीही नकोय आज मला. मी स्वतःला वाचवू शकलो, चुकलेली वाट स्वतःला दाखवू शकलो याच मला समाधान तर आहेच.पण मी आनंदी आहे. तरीही मी थांबलो नाही, अजून खूप पाऊल चालायची होती मला मरणाची भीती घालायची होती. एक नवी पहाट माझी वाट पाहत होती. मला प्रवास चालू ठेवायचं आहे हे मी किंवा माझ्या वेदनांनी विसरता कामा नये. अस म्हणतात की खूप काही जिंकण्यासाठी आधी स्वतःला जिंकण महत्वाचं असतं जर आपण तिथेच हरलो, घाबरलो, तर निश्चितच प्रवास आणि श्वास दोन्ही अपूर्ण राहतील, अगदी सकाळी सकाळी पडलेल्या स्वपना प्रमाणे. खूप लोक सांगायची मी आहे तुझ्यासोबत मी आहे तू घाबरु नको, मला नाही वाटत ते खरं बोलत असतील म्हणतील, मला खरंच गरज असताना माझ्यासाठी उपलब्ध असतील, मी काही केल्यास मी मेल्यास हसतील. त्यांची ही आश्वासन आश्वासन च राहिली त्यांनी पुढे येण्याचं प्रयत्न नाही केला. मुळात माणसाचा प्रश्न असा आहे की कोणी पडला तर त्यांची हाथ अचानक अपंग डोळे आंधळे, आणि कान बहिरे होतात. काय माहित काय जादू असते दुसऱ्या माणसाच्या त्रासात जे त्या व्यक्तीला एवढा आनंद देतात आणि ते मुक्त अस्वस्थेत विलीन होतात. मी जिंकेल हारेल माहीत नाही, पण हा पराभव मला मुळीच मान्य नाही.
कोरोनाचा एक मात्र चांगलं आहे. तुम्ही मरायच्या आधीच लोक तुम्हाला टाकून जातात, एकट्याला म्हणजे तुम्हाला पण सवय व्हावी एकट राहायची, आणि त्यांनाही.
मी जगेल मी लढेल,
मी सर्वस्व आहे, मीच विश्व आहे.
मी हा अंधार दूर करायला हवा,
हा दिवा वाऱ्यापासून दूर करायला हवा.
अविरत चालणे अवघड असले तरी,
पायांमधे माझ्या बळ नसले तरी.
थांबणे हा पर्याय नाही.
चालतात मने पाय नाही.
लाखों मृत्यू मरणार आता,
आयुष्य विजेता ठरणार आता.
ह्रुदयात सापडल्या वेदना काही,
नाही संपत असे दुःख नाही.
आयुष्य जगणे कठीण
मान्य आहे मला,
आपण जगणे सोडायला नको,
वादळाच्या भीतीने,
श्वास सोडायला नको.
