हरवताना….

आयुष्य कितीही अवघड असल तरी जगणं मात्र सोपं केलं जाऊ शकत. मान्य आपण सर्वकाही पाठीमागे सोडून येतो, खूप काही राहून सुधा जातं, पण वळून पाहताना आनंद होतो हे निश्चित आणि दुःख होतो ते वेगळच. कधी हरवलो तर स्वतःला शोधन सोयीस्कर होत, कधी भटकलो तर सापडतो घरचा रस्ता. कधी सोडून दिलेलं बर मनाशी आजवर लावलेलं, मनात खूप काही साठवता येतं, आठवलं तर आठवता येतं, स्वतःला दोषी मानतो आपण भूतकाळासाठी, वर्तमान मान खाली घालून तिथेच बसलेला असतो आपली वाट बघत पुढे भविष्याकडे वळायचं असत,  गमवलेल मिळवायचं असत. निरंतर चालणारा प्रवास पूर्ण करणे आणि अपूर्ण ठेवणे यात इच्छेच काहीच नसत. अपेक्षांचं ओझ असत एक हृदयाच्या पाठीवर, आशेने भरलेले डोळे कधी भारावून पण जातात, नेहमी पायाला लागलेली ठेच मनाला लागली तर. काही प्रश्नांची उत्तर बाकी असतात शोधन, काही टाळतो सुधा आपण. दुसऱ्याचं मन जपता जपता स्वतःच मन मात्र राहून जातं जपायच. अचानक बोलू लागतो, अचानक शांत होतो, आपल्या जीवनाचा का कसा देहांत होतो. नियती असेल नशीब असेल, सगळे हतबल करतात, ताकत म्हणून, ताकत बनून शेवटी व्यर्थ ठरतात. सगळ काही थांबत अचानक, चालणारा श्वास जीवन अजूनही जगायचं बाकी आहे, काही श्वास शिल्लक आहेत शुल्लक जिवन जगण्यासाठी अस क्षणभर सांगून जातात, शब्द जिभेवर टांगून जातात, मग काय अर्थांच्या मिठीत सापडतो फक्त शांततेचा सहवास. ओळखीच्या व्यक्तीकडून मिळालेल्या अनोळखी भावना स्वतःची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न नेहमी करतात पण आपण फिरवतो पाठ आणि होतो परके स्वतःसाठी. पाऊल थांबले तरी, प्रयत्न थांबले तरी, चालायला हवं, हवं ते मिळवण्यासाठी चालायला हवं.

Leave a comment