काही गोष्टी खोलवर मनात रुजविलेल्या बऱ्या, उगाच त्यांना बाहेर वादळ निर्माण करायला लाऊ नये. पण आपण किती दिवस त्या भावनांना एकट सोडणार, मनाच्या तिजोरीत, तीलासुधा एकटेपणा जाणवत असेल कदाचित, अंधाराची भीती प्रकाश सोडता सगळ्यांना असते अगदी, पहाटेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बेधुंद वाऱ्यालासुधा. सतत हरवणाऱ्या अस्तित्वापेक्षा एकदाच सापडलेल मरण कधीही चांगलं, कमीत कमी प्रत्येक श्र्वावसावर नजर ठेवावी लागत नाही, पुढे चालणारे पाऊल चोरतात स्वतःला जमिनीपासून.
सावट म्हणून सर्वत्र पसरणाऱ्या, सावलीला भिती फक्त उन्हाची, वादळाला दारातच सोडून एकटी भटकते आसरा शोधत, अनाथ आठवणी जाग्या होतात, संपवतो एकदाच सर्वकाही ज्याला आपल म्हणून जपल होत.
वर्षानुवर्षं जपलेली शांतता अचानक शब्दात रमून जाते, अर्थांचा मोह चडतो त्याच्या स्तबधतेला, परक्या भावना परततात मृत देहाच्या मदतीस, पुन्हा एकदा अडकवतात स्वतःला सडलेल्या विचारांच्या चोकटीत, डोळ्यांच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचतात लाटांनी विसर्जित केलेले अश्रू पण अगदी कोरडे असतात जखमांच्या जाळ्यात कैद असणाऱ्या वेदणेप्रमाने. स्वतःला नाकारून मिळवलेल अस्तित्व सापडत दयनीय अवस्थेत जिवंतपणाची प्रचिती देण्यासाठी. राहुल…….