ठरवून घेतो आता….

आता ठरवून घेतो पुन्हा नाही जगायचं,
जिथे आपल कोणी नाही त्या गावी का जायचं,
फिरून झिरून मन अगदी थकून गेलं आहे,
सगळ काही फिरल उलट, साला नशीब कुठे मेल आहे.
भेटला ओळखीचा कोणी तर भेटायला मला सांगू नका.
रक्ताला थोडी जागा द्या, तलवार कायम टांगु नका
झाला पसारा सावरून घे, मना स्वतःला आवरून घे,
आता स्वतःला सांभाळल तर अश्रू ढाळावे लागणार नाहीत,
होऊ नका स्वस्त एवढे, की लोक सहवास मागणार नाहीत
बऱ्याच काळानंतर ओसाड भिंती बोलत आहेत, पण एकने आता शक्य नाही, कारण कानांनाही सवय झालिये शांततेला ऐकत एकटे बसण्याची. पहिले वाटायची भीती अंधारात रात्र घालवायची, परंतु आता, माझ्या झोपडीकडे सावकाश येणाऱ्या प्रकाशाला बरीच कुंपणे पार करावी लागतील.

तोच अपघात घडतो रोज

तोच प्रश्न पडतो रोज,

पण तरीही दररोज घायाळ होतो मी, सांगा उगाच का उदास होतो मी
आता काही नको मला, नाही
प्रश्न ना ती ग्वाही नको मला,
जगणं माझं विस्काटूनी मला जो श्वास द्याला, तो ही नको मला,  श्वास नको सहवास द्या, फक्त शब्द नको आवाज द्या, हां हे सगळ तुम्हाला जमेल तेंव्हाच द्या,
या भासाच्या या त्रासाच्या पलिकडे काही तरी नकीच आहे,
कुणी दाबेल गळा अर्ध्या क्षणात, सगळ्यांना भीती हीच आहे..

Leave a comment