Funeral speech

मी मृत्यूच्या गावी परतलो तर,
चिंता व्यक्त होणे नाही.
आता बघून तुम्ही काय करणार,
होतो जिवंत तेंव्हाच दिसलो नाही.

हृदयाने सोडला श्वास मोकळा,
देह जळूनी गेला,
मृत्यूच्या छायेत आज मी ऊभा,
जीवना अर्थ कळूनी गेला.

मीच कळाया अवघड होतो,
मज हेच सांगणे होते.
वेदनेचा सडा अंगणात माझ्या,
ते गाव कुणाचे होते. राहुल….

Leave a comment