जेंव्हा काही माणसं…

जेंव्हा काही मानस तुम्हाला काहीही करून ओळखू शकत नाहीत, तीच मानस तुमच्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक शब्दाला तुम्हाला सांगत बसतात की मी तुला चांगलंच ओळखतो. आपण एखाद्या बाबतीत चुकीची समजूत तयार केली असेल तर आपल्याला अधिकार नाही त्याला मी समजू शकतो म्हणण्याची.. तसही गरज संपली की मानस दूर पळायला लागतात, तुमच्यात चुका शोधायला लागतात, त्यांनासुद्धा स्वतःला धीर द्यावा लागतो सोडून जाताना की हा चुकीचा वागतोय, हा स्वार्थी आहे, हा असा हा तसा. पण आपण गप्प बसायचं जस बस स्थनकाजवळ एखादा झाड असतो तसे, घट पाय रोवून उभ रहायचं, किती प्रवासी आले राहिले, गेले, येतील जातील, उतरले चडले पता नाही,उगाच त्यांचा हिशोब करण्यात वेळ घालू नये, ती माणसे येतात आपल्या आपल्या मर्जीने आणि जातात सुधा, मग का कुणाला हाथ धरून थांवण्याची वेळ यावी, त्यांचा प्रवास आपल्यापर्यंत संपत अस आपण उगाच उराशी बांधून फिरायला नको

Leave a comment