वादळ शमले नाही, थांबणे जमले नाही

वादळ आल्यास प्रत्येकजण दरवाजा कोंडून मोकळी होतात, पण वादळ मुक्त नसतो होत कधी, त्याला दूर दूर भटकाव लागत, त्याचा जन्म थांबवण्यासाठी नाही झाला बहुतेक. पण मनातल्या वादळाला थांबवण्यासाठी मी कोणत दार लाऊ बाहेरून जरी मनाची कडी लावली पण अंतरंगात ओढावलेल कस शांत करू. पाठ फिरवून निघाव कुठे थोडा आसरा शोधण्यासाठी तर सगळ उध्वस्त होईल, शांत व्हायची वाट पाहिलेली बरी. पण उभारलेल सर्व काही नष्ट तर होणार नाही ना. ती पाषानावर  अश्रूंनी जोपासलेली फुळी गळू लागलीय आता, तुटून पडतायत. त्या झाडाला कस वाटणार आयुष्यभर जपलेली संपती आपल्यापासून वेगळी होताना, त्रास होईल, वेदना होतील, पण फुल ति फुल शेवटी, जिवंत नसले तरी सुगंध दरवळत राहील त्यांचा. त्यांच्या मृत्यूच कारण मी वादळाला धराव की मनाची घुसमट जपण्यासाठी पाळलेल्या जिवंत वादळाला.

Leave a comment