लोप पावणारी आठवण.

रात रात जागन,
प्रत्येक देवा तिला मागणं,
क्षण क्षण झुरन,
लाखो विनवण्या करन,
तडपण, तरसन,
अश्रूंच होऊन बरसन,
स्पर्श जाणवू देणं,
श्वास नाव त्या घेणं,
उरलेली स्वप्न,
पुरलेली आठवण,
जगलेल क्षण,
तुटलेलं मन,
जगलेल्या राती,
हरवलेल्या नाती,
गोळा करत,
रडत पडत,
पुन्हा प्रयत्न करणे,
हेच माझ्या हाती.
शेवटी थकलेलं शरीर,
झोपलेल नशीब,
घेऊन मी जाणार कुठे.

– – राहुल…

Leave a comment