स्वतःच स्वतःला सावरत असताना, सापडले काही अर्ज जुने, आयुष्य परत मिळिण्यासाठी.

मृतदेहावर लाकडासारख्या इच्छा लादणाऱ्यानो,
सामील व्हा जळालेल्या राखेत सापडणारे माझे अवशेष शोधण्यासाठी, पुढे या डोळ्यातल्या रक्ताची मूर्ती स्थापित करण्यासाठी, माझ्या आत्महत्येत भरलेल्या रक्ताने लदबद
हाथ तुमचे देवापुढे झुकवताना लाज वाटूद्या थोडी. मला निरोप देताना तुमचे डोळे भिजणार नाहीत याची खात्री हवीय मला, माझ्या राखेला हवेत तरंगत सोडले तरी चालेल पण तुमचे निर्दयी हाथ त्याला स्पर्श करणार नाहीत याची खात्री घ करायला विसरू नका.. कपाटात गुंडाळून ठेवलेला फोटो, डोळ्यातल्या डोळ्यात ढाळलेला अश्रूचा थेंब तुम्ही आतल्या आत न पचवता वाहून द्या एखाद्या स्थिर असणाऱ्या समुद्रात. माझे डोळे बंद झाल्यानंतर कुणाचे डोळे मला शोधत इकडे तिकडे वाऱ्याच्या प्रवाहासारख भटकणार नाहीत याची जबाबदारी तेवढी घ्या. माझ्या चेहरा तुम्हाला पुन्हा दिसणार नाही, दिसला तरी मी त्यात असणार नाही, रडायचं जरा विचार सोडा, मी अश्रू पुन्हा पुसणार नाही आता…..

2 thoughts on “स्वतःच स्वतःला सावरत असताना, सापडले काही अर्ज जुने, आयुष्य परत मिळिण्यासाठी.

Leave a comment