वळून पाहता कळून चुकले..

हातातून रेती निसटून जावी तस नाती निसटून जातात, आपण अपंग उभे राहतो, समुद्र किनारी, पाण्याची ओहोटी पायाला स्पर्श करून हरवलेल्या मनाला शोधण्यास मदत करते. आशेच एक क्षितिज, पाठ फिरवून थांबलेला असतो त्या पलिकडे दिसतात काही चेहरे काळाच्या पडद्याआड लपलेली. क्षणभर शांतता पसरते मनाच्या गोंधळाला न्याय देण्यासाठी. हातात उरलेलं असत आयुष्य ते उधळावं की जपावं मनाची हेळसांड पाहून हाच प्रश्न उपस्थित होतो. आयुष्य आणि जगणं यात फार दुरावा आलेला असतो, आपण श्र्वासाच अंतर भेदन्या असमर्थ ठरतो. स्वतःच अस नाउमेदी जीवन जगताना मदत अजिबात करावी वाटत नाही.

Leave a comment