जगण्यासाठी थोडे अजून क्षण हवेत,
अर्ज दाखल करू का पुन्हा,
आज पुन्हा हाकलून लावलय,
नशीब नावाच्या कोर्टातून मला,
त्या दगडाच अस्तित्व नाकारलं म्हणून,
याचिका माझी जाळलीत का,
जी तत्वे मला दिली, सांगा तीच तुम्ही पळलीत का?
सावळा माझा रंग म्हणून झाली माझी चूक का?
आम्ही नेहमीच स्तबध जागेवर तुमची आगेकुच का?
घाम गाळणारे आम्ही, पण रक्त पिणारे तुम्हीच का,
हव्या पाकळ्या नव्या तुम्हाला , मूल्य आजही जुनीच का?
Outstanding performance Sir 👌👍💐
LikeLiked by 1 person
खूप खूप आभार
LikeLike