जिवंतपणीच मरण पावतात काही आठवणी, तडपून तडपुन याचना करत असताना, सगळे बहिरे होतात, डोळे पाणावले तर अपंग होतात,
मेल्यानंतर थडग्यावर रडायला बरेच येतात, चार थेंब गाळतात आपल्या थडग्याचा मध्यभागी, स्वतःला सावरत फिरतात, भटकतात माहीत नसलेल्या ठिकाणी.
मेल्यावर सगळे येतात,
काही सोबत काही वेगळे येतात,
काही अश्रू पुसायला, काही हसायला आपल्या मृत देहाच्या चेहऱ्यावर, डोळे भरून , हाथ फिरवतात डोक्यावरून, मेलेल्या डोळ्यात शोधसात काही चुका भूतकाळात जमा केलेल्या, काही क्षण विसरतात, सोबत घालवलेले, पांढरा कपडा लादून आपल्यावर, जखमा मात्र त्यांचा लपवतात.
सांग आठवतात का तुला, अंधारात चाचपडत असताना दिलेले आनंद. एकांताला हरवण्यासाठी सहवास पाहिजे फक्त, शांततेला बोलका करणारा आवाज पाहिजे, जीवनाला अर्थ देतील असले शब्द हवे, जपायला आठवणी द्या, हृदयाला अनंत जिवंत ठेवतील अशा भावना हव्या, वर्तमानाशी झुंज देणारे भविष्य हवे, नशिबाने निर्माण केलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी दोन हाथ हवेत, पण तेच हाथ हर जिवंत माणसाला समाधी म्हणून वागवत असतील, आणि हाथ पाशाणासमोर जोडले जात असती तर, अपंग जीवन केंव्हाही चांगले. जीवनाला आकार हवा, स्वप्नांना साकार हवा, चार क्षण थांबण्याचे स्थैर्य हवे, अपुऱ्या प्रयत्नांना धैर्य हवे. हव्या थोड्याशा आशा, स्वतःला जाळीत राहणे, केंव्हाही चांगल कारण, पंतीची वात जोवर तोवर प्रकाश, पंती विझल्यास उरतो फक्त अंधार